पेठ वडगावात बकरी ईद उत्साहात
पेठ वडगांव, (प्रतिनिधी):- शहर व परिसरात ईद-उल-अजहा अर्थात बकरी ईद सोमवारी (दि.१७ )रोजी धार्मिक पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासून ऊन-पाऊस सुरू असला तरीदेखील मुस्लीम बांधवांमध्ये ईदचा उत्साह कायम होता. ईदगाह मैदानावरपरंपरेनुसार मौलाना मुबीन मुजावर यांच्या नेतृत्वात ईदचे सामुहिक नमाजपठण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय एकात्मता, जातीय सलोखा व शांतता नांदावी, यासाठी विशेष ‘दुवा’ मागण्यात आली.यावेळी मुस्लिम ट्रस्टचे अध्यक्ष गुलाब बागवान यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी युवक काँग्रेसचे सुरज जमादार,तय्यब कुरेशी,खलिल कवठेकर,जमिर महालदार,अदिलशहा फकिर,सिराज जमादार,अभिजीत पोळ,सुनिल हुक्केरी,राजकुमार पोळ,नितिन दिंडे उपस्थित होते.