ईगल फौंडेशन संस्थेचे २०२४ चे पुरस्कार वितरण उत्साहात
सांगली, (प्रतिनिधी):- डॉ.अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल आष्टा येथे गौरव सोहळा संपन्न झाला.आ.रामहरी रुपनवर,डॉ.डी.वाय पाटील शिक्षण समूहाचे विश्वस्त प्रा.सुर्यकांत तोडकर,सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले श्री प्रविण काकडे,रासपाचे महासचिव ज्ञानेश्वर सलगर,भारतीय अन्न महामंडळाचे सदस्य प्रा.कृष्णा आलदर,श्री सुनिल शिनगारे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ.रुपनवर,प्रविण काकडे,प्रा.आलदर, प्रा.तोडकर यांनी फाऊंडेशन च्या या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी पत्रकार प्रशांत चव्हाण, श्री लुनेश वीरकर, सागर जगताप, श्री संदिप पाटील,दिनेश कांबळे,अशोक शिंदे,संजय गायकवाड, प्रशांत वंजोळे ,सौ.शालन कोळेकर आदी पत्रकार उपस्थित होते. सर्वांचे स्वागत विलासराव कोळेकर यांनी केले.तर आभार सागर पाटील यांनी मानले.
सन २०२४ चे ईगल फौंडेशनचे पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. त्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर चे सहाय्यक कुलसचिव डॉ.शिवाजी नारायणराव शिंदे, समाजकल्याण आयुक्तालय पुणे च्या उपसंचालक श्रीमती निशादेवी संभाजी बंडगर (वाघमोडे), दै.स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.किशोर पाटील,श्री गणेश आखाडा भाईंदरचे वस्ताद श्री वसंतराव पाटील ,दै.तरुण भारतचे आष्टा येथील पत्रकार सुनिल एकनाथ पाटील,कोल्हापूर येथील पत्रकार श्री अमोल पांढरे (इलेक्ट्रॉनिक मिडिया), पत्रकार श्री बाळासाहेब कोळेकर (इलेक्ट्रॉनिक मिडिया),श्री अविनाश रामचंद्र गायकवाड,आर.एस.पी.ऑफीसर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी, डॉ.मीना प्रमेंद्र श्रीवास्तव, दै.महासत्ता चे शिराळा प्रतिनिधी श्री विनायक गायकवाड, सौ.अर्चना सुरेश पाटील ,मुंबई हायकोर्ट वकील संघटनेचे उपाध्यक्ष ॲड विकास कोळेकर , श्री राजाराम खंडू व्हनखंडे प्रा.डॉ.जयसिंग होनाजी गाडेकर, श्री माधव मंचकराव मुंडे ,श्री रामराजे फड खादगांवकर , श्री संजय वाघमोडे, श्री तानाजी मारुती पाटील, संध्या अंकुश जानकर, सौ.पल्लवी वढवेकर बर्वे ,गंधारधून.. संस्था , श्री सुनील यशवंत हळदणकर, श्री सुरेश केसरकर , श्री प्रशांत पुजारी वाडीकर, श्री निलेश बाळाराम पाटील, श्री विक्रम राजाराम धुमाळ,श्री बापू पांडुरंग जेधे ,श्री बबनराव गंगाराम धायगुडे ,सौ.भारती औटी ,श्री बाळा यशवंत साठे,माधुरी अनिल पाटील ,श्रीमती सुनंदा मधुकर वायदंडे ,श्री संदीप हणमंत कुंभार यांना सन्मानचिन्ह, मानपत्र देवून गौरविण्यात आले. सदर सोहळा रोजी आष्टा येथील मा.डॉ.अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुल सभागृह आष्टा ता.वाळवा जि.सांगली येथे पार पडला.सदर सोहोळ्यासाठी अनेक वृत्तपत्राचे संपादक , इलेक्ट्रॉनिक मिडीयाचे विशेष प्रतिनिधी, पत्रकार, व मान्यवर उपस्थित होते.