हेरले प्रतिनिधी : कोरोना आजार होऊ नये यासाठी प्रतिबंध उपाययोजना म्हणून गावातील सर्वांनी मास्कचा वापर करणे व संसर्ग होऊ नये म्हणून सतर्क राहाणे या उपाय योजनेच्या अमंलबजावणीच्या माध्यमातेतून सर्वांनी येत्या पंधरा दिवसात गाव कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्नशील राहूया, असे मत जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी व्यक्त केले. ते हेरले ( ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयामधील झालेल्या आढावा बैठकी प्रसंगी बोलत होते. हेरले गावास भेट देऊन गाव कोरोना मुक्त होण्यासाठी ग्रामपंचायत व कोरोना सनियंत्रण समितीने कशा पद्धतीने उपाय योजनेच्या माध्यमातून प्रशासन यंत्रणा राबविली आहे. त्याची पाहणी करणे व समितीस उपाय योजना राबिवण्यासाठी प्रेरणा देण्याच्या उद्देशाने जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे यांनी भेट देऊन आढावा बैठक घेतली. त्यांचे स्वागत महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन जिल्हा पोलिस प्रमुख शैलेश बलकवडे म्हणाले, येत्या पंधरा दिवसामध्ये गाव कोरोना मुक्त करण्यासाठी अखंडित गावातील प्रशासन यत्रंणा राबवावी. त्यासाठी पोलिस प्रशासनाकडूनही मदत दिली जाईल. गावामध्ये सकाळी साते ते दोन व सायंकाळी सहा ते दहा वाजेपर्यंत एक कॉन्स्टेबल व एक गृहरक्षक तैनात करण्यात येईल. आजारी रूग्णांच्या चाचण्या वाढव्याव्यात, लक्षणे विरहित सकारात्मक अहवाल असणाऱ्या रुग्णांचा सर्व्हे करावा, गावातील सर्वांना मास्कचा वापर करण्याची अमंलबजावणी करावी, मजुर, कामगार, नोकर, यांची कामानिमित्त दैनदिंन धावाधाव असल्याने त्यांचा जास्त संपर्क आलेला असतो त्यामुळे त्यांचा सर्व्हे करून चाचणी करावी, कंटेनमेंट झोन करून त्याची अमंलबजावणी करावी, कोरोना आजाराच्या भितीने चाचणी न करणाऱ्यांचे प्रबोधन करावे आदी उपाय योजना सांगितल्या. गावामध्ये सर्वच घटकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व प्रतिबंधासाठी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. यापुढेही सर्वांनी एकजुटीने असेच कार्य सुरू ठेवून गाव कोरोना मुक्त होण्यासाठी प्रयत्नशिल राहावे असे आवाहन केले. या आढावा बैठकित जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती डॉ. पद्माराणी पाटील,माजी सभापती राजेश पाटील, वैद्यकिय अधिकारी डॉ. राहूल देशमुख, पोलिस पाटील नयन पाटील, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण , माजी उपसरपंच राहूल शेटे, मुनिर जमादार आदींनी गावात राबविलेल्या उपाय योजनामध्ये उपकेंद्राची स्थापना, आरटीपीसीआर व अँटीजन चाचण्या,विलगिकरण केंद्राची स्थापना, गावातील सहा प्रभागातील घर टू घर टू सर्व्हे करून कुटुंबातील सदस्यांची केलेली आरोग्य तपासणी, रूग्ण वाहिकेची सोय, घोडावत कोव्हिड केंद्रामध्ये रुग्णांची भरतीची सोय आदी राबविलेल्या उपाय योजनांची माहिती दिली. या आरोग्य सेवेत ग्रामपंचायत व सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडिकल असोसिएशन, एमआर असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, सेवाभावी संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य लाभल्याने आरोग्य सेवा प्रबळ बनल्याने मृत्यू संकट कमी झालेले आहे अशी माहिती बैठकित देण्यात आली. या बैठकिस पोलिस उपअधिक्षक रामेश्वर वैजणे, पोलिस निरीक्षक के एन पाटील,पोलिस उपनिरीक्षक यशवंत उपराटे , पोलिस उपनिरीक्षक बडे , सरपंच प्रतिनिधी संदिप चौगुले, तलाठी एस. ए. बरगाले, उपसरपंच सतिश काशिद, माजी उपसरपंच विजय भोसले,डॉ.आर.डी. पाटील, डॉ.अमोल चौगुले, दादासो कोळेकर, महमंद जमादार आदी मान्यवर उपस्थित होते.