३०खाटाचे रुग्णालयाच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात , नामदार रांजेंद्र पाटील यड्रावकर

    नवे पारगाव :  किणी (ता हातकणंगले) येथे राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या३०खाटाचे रुग्णालयाच्या उभारणी कामाला लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे आरोग्य राज्य मंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार राजुबाबा आवळे यांनी भेटी दरम्यान सागितले.
    किणी (ता. हातकणंगले) येथे मंजूर झालेल्या रुग्णालयाच्या जागेस आरोग्य राज्य मंत्री नामदार राजेंद्र पाटील यड्रावकर व आमदार राजुबाबा आवळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय.पाटील यांनी अधिका-या समवेत भेट देऊन तात्रीक बाबींची माहिती घेतली
    पुणे बंगलोर महामार्गावरील अपघातातील जखमींच्यावर तातडीने उपचारासाठी व पचंक्रोशीतील नागरीकांच्या आरोग्य सुविधेसाठी मोठ्या शासकीय रुग्णालयाची अनेक वर्षे मागणी होती यासाठी संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली किणी ग्रामपंचायतीच्या वतीने पाठपुरावा केला होता आरोग्य राज्य मंत्री नामदार राजेंद्र पाटील व आमदार राजुबाबा आवळे यांच्या प्रयत्नाने रुग्णालय मंजुरी मिळाली आहे याच्या बाधंकामासाठी १४कोटी२१लाख रुपयांचा निधी मंजूरी मिळाली आहे या पार्श्वभूमीवर आज जागेची पाहाणी केली.
    यावेळी , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल माळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता बी.एल.हजारे,उपअभियंता यु.एस.करांडे , वारणा दूध संघाचे संचालक अँड.एन.आर.पाटील ,उपसरपंच अशोक माळी,माजी सरपंच बाळगोंडा पाटील, किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुहास माने, सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामविकास अधिकारी व्ही.टी. पंडित, यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान किणी गावासाठी जास्तीत जास्त कोरोना लसींचा पुरवठा करावा अशी मागणी सुहास माने यांनी निवेदनाद्वारे केली.
    प्रतिनिधी संतोष जाधव नवे पारगाव.