शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी लढणार ,आमदार प्रा.जयंत आसगांवकर

    श्री.शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगावकर यांचा सत्कार करताना अभिजित गायकवाड, प्रदीप पाटील, एस.डी.लाड,सुनील हुकेरी, बी.जी.बोराडे आदी.

     

    पेठ वडगांव : येथील श्री.शाहू शिक्षण प्रसारक मंडळाच्यावतीने प्रा.आमदार जयंत आसगांवकर यांचा सत्कार करणेत आला यावेळी बोलताना कोरोनाचा सामना करताना शिक्षकांनी ‘माझा विद्यार्थी, माझी जबाबदारी ‘ही जबाबदारी पार पाडावी. शिक्षकांनी प्रतिमा उंचावण्यासाठी सामाजिक योगदान द्यावे. शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी लढणार असून त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल. असे प्रतिपादन पुणे विभाग शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी केले. ते पेठ वडगांव येथील श्री. शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाच्यावतीने आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपनगराध्यक्ष सुनील हुकेरी होते. यावेळी संस्थेचे कार्यवाह अभिजीत गायकवाड, प्राचार्य प्रदीप पाटील, शैक्षणिक व्यासपीठाचे एस.डी. लाड. बी.जी. बोराडे, उदय पाटील, खंडेराव जगदाळे, के.के. पाटील, डी.एस.घुगरे, राजेंद्र माने, प्राचार्या विजया चव्हाण, सुभाष पाटील प्रमुख उपस्थित होते. यावेळी आमदार आसगावकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच परिसरातील पद्दोनोतीने मुख्याध्यापक झालेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.सुनील हुकेरी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक प्राचार्य प्रदीप पाटील यांनी केले. आभार उपप्राचार्य किरण कोळी यांनी मानले. यावेळी पर्यवेक्षक मनीषा पोळ, पी.बी. पाटील,आनंदराव म्हेत्रस, रायसिंग भोसले,शोभा देसावळे, गिरीजा देवस्थळी , व्ही.जी.पवार , बाबासाहेब पाटील तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत भोरे यांनी केले.