श्रीमंत जिजाऊ फौंडेशन यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी

    वडगांव :हेरले ता.हातकणंगले येथे कै अश्विन सर्जेराव जाधव यांच्या ५ व्या पुण्यस्मरणार्थ माने केअर हॉस्पिटल जयसिंगपूर व हातकणंगले अँण्ड इ.एन.टी.क्लिनिक व श्रीमंत जिजाऊ फौंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व मोफत डोळे तपासणी तसेच मोतीबिंदू ऑपरेशन शिबिराचा उदघाटन समारंभ हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजप-जनसुराज्य चे नेते व जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ .अशोकराव माने यांच्या हस्ते पार पडला यावेळी जयसिंगपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉ.नीता माने,राहुल शेटे ( उपसरपंच हेरले )अर्जुन पाटील (उद्योजक), रणजित इनामदार , (ग्रा.प.सदस्य) ,बक्त्यार जमादार ( युवा नेते ), अमर वड्ड (ग्रा.प.सदस्य) , विनोद वड्ड, विशाल परमाज, साक्षी पन्हाळकर ( संस्थापक – जिजाऊ फाऊंडेशन ),पत्रकार निर्मळे सर,पत्रकार अनिल उपाध्ये, अशोक मुंडे सर , अमित कोळेकर , सारंग पाटील ( अध्यक्ष – जिजाऊ फाऊंडेशन ) राकेश जाधव (ता. -उपाध्यक्ष जिजाऊ फाऊंडेशन )प्रवीण वड्ड ( उपाध्यक्ष – जिजाऊ फाऊंडेशन )रोहन माने , प्रकाश खाबडे ( सामाजिक कार्यकर्ते) भरत चौगुले ,डॉ. अभिजित माने,डॉ. अमोल चौगुले,डॉ.अमित पाटील तसेच ग्रामस्थ उपस्थित होते,यावेळी १३० लोकांची तपासणी करण्यात आली.