वाढत्या रुग्णसंख्येवर लॉकडाऊन हा पर्याय नाही, आरोग्यमंत्री राजेश टोपे

     

    मुंबई: कोरोनाचे रूग्ण राज्यात झपाट्याने वाढत आहेत.अनेक मोठ मोठ्या शहरांमध्ये निर्बंध घालण्यात आले आहेत. तरीसुद्धा कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
    लॉकडाऊन हा काही पर्याय नाही. आम्ही लॉकडाऊन करणार नाही. मुंबई आणि राज्यात लॉकडाऊन लावण्याचे कारण नाही. पण शिस्त लावण्यासाठी कठोर निर्बंध लावणार, असं मंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते.
    सध्या रूग्णालयात बेड उपलब्ध आहे. लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याची गरजे आहे.
    खासगी रूग्णालयात लसीकरण मोठ्या प्रमाणात करण्याचे आदेश दिले आहेत. ६० वर्षांपेक्षा जास्त वयोगटाच्या जेष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं, असं आवाहन देखील मंत्री राजेश टोपेंनी केलं.