Home Breaking News इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघातर्फे पुरस्कार जाहीर, वि.प.उपसभापती डॉ.निलमताई गोर्‍हे यांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे...

इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघातर्फे पुरस्कार जाहीर, वि.प.उपसभापती डॉ.निलमताई गोर्‍हे यांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघातर्फे पुरस्कार जाहीर, वि.प.उपसभापती डॉ.निलमताई गोर्‍हे यांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण

 

 

कुंभोज/प्रतिनिधी (विनोद शिंगे) :-येथील इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनाच्या निमित्ताने दिल्या जाणार्‍या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पत्रकार दिनी सोमवार 6 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4.00 वाजता रोटरी क्लब सभागृह दाते मळा येथे हा पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. हा पुरस्कार वितरण समारंभ प्रमुख अतिथी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोर्‍हे यांच्या हस्ते संपन्न होणार आहे, अशी माहिती पत्रकार संघाचे अध्यक्ष अतुल आंबी यांनी दिली. तसेच यावेळी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली.

Advertisements

यावर्षीच्या पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणार्‍या मारवाडी युवा मंच मिडटाऊन यांना ‘सामाजिक’, क्रीडा क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करत वस्त्रनगरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणारा कबड्डीपटू आर्यवर्धन अमर नवाळे याला ‘क्रीडा’, सिल्व्हर जॅकार्ड च्या माध्यमातून वस्त्रोद्योग क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणारे समीर नाईक यांना ‘वस्त्रोद्योग’, आयएसओ मानांकन मिळवून शैक्षणिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करणार्‍या महानगरपालिकेच्या सरोजिनी नायडू विद्या मंदिर क्रमांक 43 या प्रशालेस ‘शैक्षणिक’ आणि पेंटींग उद्योगात स्वत:चा ब्रॅण्ड निर्माण करत छाप उमटविणारे रमाकांत वाळवेकर यांना ‘उद्योजक‘ पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचबरोबर वेटलिफ्टर महिला खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अश्‍विनी मळगे यांचा यानिमित्ताने ‘विशेष सत्कार’ करण्यात येणार आहेत. शिवाय पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य पाच दशकांहून प्रेसफोटोग्राफी करणारे छोटुसिंग राजपुत यांना ‘जीवन गौरव’ पुरस्कार देण्यात येणार आहे.

आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या कार्यक्रमास खासदार धैर्यशील माने, माजी आमदार प्रकाश आवाडे, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे, यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन संघाचे अध्यक्ष अतुल आंबी आणि रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीचे अध्यक्ष संतोष पाटील यांनी केले आहे. यावेळी इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य तसेच रोटरी सदस्य उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements