Home आरोग्य कुंभोज आयुष्यमान आरोग्य मंदिरात औषधाचा तुटवडा आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष

कुंभोज आयुष्यमान आरोग्य मंदिरात औषधाचा तुटवडा आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

कुंभोज आयुष्यमान आरोग्य मंदिरात औषधाचा तुटवडा आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष

 

 

कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-कुंभोज तालुका हातकलंगले येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या आयुष्यमान आरोग्य मंदिरात गेल्या काही दिवसापासून औषध व गोळ्यांचा तसेच इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आला असून सर्वसामान्य रुग्णांना दवाखान्यात चेकअप केल्यानंतर कमी प्रमाणात औषधे दिली जात असल्याचे चर्चा होत असून,अनेक रुग्ण इंजेक्शन पासून फारच दूर असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी कोल्हापूर जिल्ह्यातले आरोग्यमंत्री प्रकाश अबिटकर यांच्याकडे काही नागरिकांनी याबाबत तक्रार दाखल केली असून, कुंभोज प्राथमिक आयुष्यमान मंदिरासाठी आवश्यक तितक्या प्रमाणात औषध पुरवठा करावा त्याच पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य उपचारासाठी आवश्यक असणारे इंजेक्शनचे सोय करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Advertisements

परिणामी कुंभोज हिंगणगाव बुवाचे वाठार नेज व दुर्गेवाडी या गावासाठी सदर आयुष्यमान मंदिराची सोय करण्यात आली असून जर आरोग्य मंदिरातच औषध व इंजेक्शन उपलब्ध नसतील तर रुग्णांनी जायचे कुठे असा सवाल निर्माण झाला आहे. परिणामी सर्वसामान्य रुग्णांमध्ये सदर आयुष्यमान मंदिरातील सेवे बाबत तीव्र संताप व्यक्त होत असून, आरोग्य कर्मचारीही रुग्णांशी उद्धट भाषेत बोलत असल्याचे चर्चा होत आहे. परिणामी सदर आरोग्य मंदिराकडे कोणाचे लक्ष आहे का असे सवाल सध्या निर्माण होत असून आरोग्य मंदिरातच औषधी उपलब्ध नसतील तर सर्वसामान्य नागरिकांनी जायचे कुठे असा प्रश्न निर्माण होत असून, काही आरोग्य कर्मचारी उपचारासाठी आपण तारदाळ येथे जा अशा सूचना करत असल्याचे चित्र दिसत आहे. परिणामी वीस हजार पेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या कुंभोज गावात नागरिकांच्या मागणीनुसार प्राथमिक आरोग्य मंदिराची स्थापना करण्यात आली,त्याचे उद्घाटन होऊन अजून दोन महिने व्हायच्या आतच आयुष्य मान मंदिरात औषधाचा तुडवडा भासत असल्याने नूतन आरोग्यमंत्र्यांनी सदर आरोग्य मंदिरात लक्ष घालून त्याला खऱ्या अर्थाने मंदिराचे रूप द्यावी अशी मागणी कुंभोज ग्रामस्थातून सध्या जोर धरत आहे.

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements