हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे धरणे आंदोलन करणार- शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना

    हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे धरणे आंदोलन करणार- शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना

     

    हेरले / (प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य 2005 पूर्वी टप्पा / अंशतः अनुदान प्राप्त शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे विविध मागण्या करिता निदर्शने, धरणे आंदोलन करणार.

    1 नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशतः/ टप्पा अनुदान प्राप्त शिक्षकांना 1982 ची जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात यावी. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने100 टक्के अनुदानित शाळेतील 1नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त विनाअनुदनित तुकडीवरील शिक्षकांना जूनीच पेन्शन योजना लागू करावी, या आदेशाची अंमलबावणी तत्काळ करावी.

    विनाअनुदनित शिक्षकांना उपदानसुद्धा नियुक्ती दिनांक ग्राह्य धरूनच देण्यात यावे.शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे 10/ 20//30 आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात यावी, आदी मागण्या करीता संघटनेच्या वतीने हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे गुरूवार 19 डिसेंबर 2024 रोजी निदर्शने, धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे महासचिव प्रा. अभिजित धानोरकर परभणी, उपाध्यक्ष प्रा. संपत कदम नाशिक, कार्यवाह प्रा. योगेश्वर निकम, कोष्याध्ध्यक्ष सुनिल कांबळे आदींच्या सह्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांना पाठीवले असल्याचे माहिती महाराष्ट्र राज्य 2005 पूर्वी अंशतः/टप्पा अनुदानप्राप्त शिक्षक शिक्षकेत्तर संघटनेचे अध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर, कोल्हापूर यांनी प्रसिद्धीस पत्रकाद्वारे दिली.