Home कोल्हापूर जिल्हा डॉ.डी.एस.घुगरे यांची राज्य अभ्यासक्रम निर्मिती करीता निवड

डॉ.डी.एस.घुगरे यांची राज्य अभ्यासक्रम निर्मिती करीता निवड

डॉ . डी. एस. घुगरे यांची राज्य अभ्यासक्रम निर्मिती करीता निवड

 

 

हेरले / (प्रतिनिधी):- राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद एस सी ई आर टी महाराष्ट्र पुणे मार्फत राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 तयार करण्यात आला आहे .
राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 यावर आधारित शालेय अभ्यासक्रम निर्मिती करिता शारीरिक शिक्षण व निरामयता या विषयाकरिता तज्ञ सदस्यपदी आदर्श शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. डी .एस. घुगरे यांची निवड झाली.
डॉ. डी.एस. घुगरे हे स्वातंत्र्य सैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन आणि ज्युनिअर कॉलेज मिणचे ता . हातकणंगले येथे मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असून ते राष्ट्रीय खेळ आहेत. ते 27 वर्ष क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत . त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज अखेर विविध क्रीडाप्रकारात 2790 राज्य , 423 राष्ट्रीय व 23 आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवक कल्याण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत जिल्हा युवा पुरस्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते शाळेस मिळालेला आहे .विद्यालयामध्ये शिवजयंती निमित्त सूर्यनमस्कार उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत 400 विद्यार्थ्यांनी 1 लाख 4 हजार 444 सूर्यनमस्कार 40 मिनिटांमध्ये घालण्याचा विक्रम केला आणि याची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली तसेच शिवजयंती निमित्त विद्यालयामध्ये शिवपारायण उपक्रम घेण्यात आला यामध्ये 555 विद्यार्थ्यांनी शिवचरित्र वाचन केले आणि या उपक्रमाची नोंद इशियन बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये घेण्यात आली असे नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेमध्ये ते सतत राबवत असतात .
त्यांनी योगशास्त्र विषयाअंतर्गत डिप्लोमा इन योगा एज्युकेशन पदवी व शिक्षणशास्त्र या विषयांतर्गत पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. राज्य व जिल्हा क्रीडा विविध असोसिएशनवरती विविध पदावर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ ,महामंडळ येथे उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत .
त्यांना डाएटचे प्राचार्य डॉ .राजेंद्र भोई, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ .एकनाथ आंबोकर यांचे प्रोत्साहन मिळाले. त्यांचे निवडीबद्दल शिक्षणक्षेत्रात कौतुक होत आहे .