लातूर: अंबाजोगाई येथून लातूरकडे निघालेल्या लातूर आगाराची एसटी बस क्रमांक एम एच २० बी एल १०५३ या बसच्या चालकाने रेणापुर पिंपळफाटा जवळ मेन रोडवर उभा असलेल्या विटाने भरलेल्या ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने भीषण अपघात झाला. हा अपघात रात्री आठ च्या दरम्यान झाला अपघात एवढा मोठा होता की जवळपास अर्धी बस पूर्णपणे चिरली असून अनेक प्रवासी अडकून पडले होते या दुर्घटनेत आठ ते नऊ लोकांना शासकीय रुग्णालयाकडे उपचारासाठी पाठवण्यात आले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे विशेष म्हणजे ड्रायव्हर साईडने जबर धडक दिल्याने ड्रायव्हर अडकून पडला होता असे अनेकांनी सांगितले.