वाठार येथे विविध स्पर्धेचे आयोजन
वाठार, (प्रकाश कांबळे):-वाठार (ता.हातकणंगले)) येथे कै. किशोर राजाराम भोसले यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शशिकांत भोसले यांनी दिली
कन्या विद्या मंदिर वाठार तर्फ वडगांव येथे 30 सप्टेंबर रोजी शाळेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या मधील प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार आहे इयत्तावार विविध स्पर्धा खालील प्रमाणे
इयत्ता पहिली व दुसरी : रंगभरण स्पर्धा
इयत्ता तिसरी व चौथी : निसर्ग चित्र काढणे व रंग देणे
इयत्ता पाचवी : माझी शाळा या विषयावर वीस ओळी निबंध लिहिणे
इयत्ता सहावी व सातवी :रांगोळी स्पर्धा
वरील प्रमाणे स्पर्धा होणार आहेत त्याचे बक्षीस वितरण समारंभ सरपंच सचिन कांबळे व ग्रामपंचायत सदस्य व वाठार मधील प्रतिष्ठित नागरिक यांच्या हस्ते होणार आहे तरी कन्या शाळेतील विध्यार्थीनींनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा आहे यावेळी सर्जेराव भोसले, राजाराम भोसले,शशिकांत भोसले, विनायक भोसले उपस्थित होते.