संच मान्यतेचा शासनाचा निर्णय व कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश रद्द व्हावा-जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची मागणी
हेरले / (प्रतिनिधी) :-१५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा शासनाचा निर्णय आदेश ताबोडतोब रद्द करावा व ५ सप्टेंबर २०२४ चा कंत्राटी शिक्षक नेमण्याचा आदेश रद्द व्हावा यासह अनेक मागण्यांच्यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने शुक्रवार दि. २७ सप्टेंबर २०२४ रोजी कोल्हापूर जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य महामोर्चा काढण्यात आला. कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ व शिक्षण संस्था चालक संघ,प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने नेतृत्वाखाली हा महामोर्चा काढून निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय तेली यांना लेखी निवेदन देण्यात आले.
या महामोर्चात ४६ शिक्षण क्षेत्रातील संघटना सहभागी झाल्या होत्या.
शिक्षणाचे कंत्राटीकरण रद्द करा,शैक्षणिक कामे रद्द करा,शिक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,शिक्षण क्षेत्र उध्वस्त करू नका,राष्ट्रपती की संतान हो या चपरासी का बेटा सबको शिक्षा एक समान!,शिक्षणावरील बजेट वाढविलेच पाहिजे, आदी घोषणांनी मोर्चा मार्गावरील परिसर दणाणून गेला.
मोर्चा टाऊन हॉल दसरा चौक व्हिनस कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालया जवळ आले नंतर मोर्चाचे रूपातंर सभेत झाले. या सभेत
एस डी लाड,दादा लाड,अनिल लवेकर,भरत रसाळे,राजाराम वरुटे,प्रसाद पाटील,रवी पाटील,आर वाय पाटील,मंगेश धनवडे,संदीप पाडळकर,प्रमोद तौंदकर आदींनी भाषणे केली. सूत्रसंचालन उमेश देसाई यांनी केले.
लेखी निवेदनातील मागण्या या प्रमाणे १५ मार्च २०२४ चा संच मान्यतेचा निर्णय रद्द करावा, २० किंवा २० पेक्षा कमी पटसंख्येच्या शाळेंच्या बाबतीत कार्यरत शिक्षकाचे १ पद बंद करण्याचा निर्णय आणि कंत्राटी पद्धतीने सेवा निवृत्त व अन्य नियुक्ती देण्याचा ५ सप्टेंबर २०२४ चा शासन निर्णय आदेश रद्द करावा, विद्यार्थी आधार कार्ड संबंधांने असणाऱ्या वास्तव अडचणी लक्षात घेऊन आधार कार्ड आधारित शिक्षक पद निर्धारन धोरण रद्द करावे, सातव्या वेतन आयोगातील पदवीधर शिक्षकांच्या व वरिष्ठ वेतन श्रेणी धारक शिक्षकांच्या वेतन त्रुटीचा विषय मार्गी लावावा, १ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या सर्वांनाच १९८२ ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, टप्पा अनुदान शाळांना पुढील अनुदानाचे टप्पे तात्काळ मिळावेत, शिक्षकांची अशैक्षणिक कामे बंद करावीत आदी मागण्यांचे लेखी निवेदन देण्यात आले.
या प्रसंगी चेअरमन राहुल पवार,बाळ डेळेकर, व बी. जी. बोराडे, सुधाकर निर्मळे,खंडेराव जगदाळे, बाबा पाटील,प्रा.सी.एम. गायकवाड,सुधाकर सावंत,उमेश देसाई, उदय पाटील, के के पाटील,राजेंद्र कोरे,संतोष आयरे,गौतम वर्धन, मिलींद बारवडे आदी संघटनेचे प्रमुख पदाधिकारीसह सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी, मोर्चात मोठ्या संख्येंनी सहभागी झाले होते.