प्राचार्य कृष्णात बसागरे नेशन बिल्डर अवॉर्ड ने सन्मानित
पेठ वडगांव,(प्रतिनिधी):- रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेन्ट्रल यांचेवतीने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केलेबद्दल प्राचार्य कृष्णात बसागरे यांना शिवाजी विद्यापीठाचे माजी परीक्षा नियंत्रक डॉ.बी.एम.हिर्डेकर सर यांचे हस्ते नेशन बिल्डर अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले यावेळी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कलाशिक्षक सागर बगाडे सर यांचाही विशेष सत्कार करणेत आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागीय चेअरमन एम.बी.शेख होते .
रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेंट्रल चे प्रेसिडेंट संजय भगत यांनी स्वागत तर प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी प्रास्ताविक केले .
यावेळी डॉ.हिर्डेकर सर तसेच एम बी शेख यांनी मनोगत व्यक्त केले .
सागर बगाडे यांनी राष्ट्रीय पुरस्कार संदर्भातील दिल्ली येथील अनुभवकथन केले.
यावेळी रो.राहूल कुलकर्णी रो.रवी पाटील ,रो. विशाल पाटील, रो.निलेश पाटील रो.बदाम पाटील तसेच सर्व निमंत्रित उपस्थित होते .