पेठ वडगांव : शहरामध्ये याआठवड्यात नविन वसाहत मध्ये एक , रामनगर येथील एक असे दोन युवक पाँझिटीव्ह आढळून आलेनंतर आज शहरातील मुख्य बाजार पेठेत पद्मा रोड वरील एक महिला आढळून आलेने पालिका प्रशासनाची तारांबळ उडाली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सद्या शहरात पोलिस प्रशासन व नगर पालिका प्रशासनाने विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचा बडगा उचलला आहे.
नागरिकांनी सतर्क राहण्यासाठी पालिका प्रशासन वेळोवेळी सुचना करत असुन देखील नागरिक विना मास्क शहरात फिरत असतात.
वडगांव शहरात सोमवारपासुन मिळणार मोफत लस,
वडगांव पालिकेच्या बळवंतराव यादव हाँस्पिटल मध्ये सोमवार पासून जेष्ठनागरीकांना कोरोना लस मोफत मिळणार असुन हि लस पूर्णपणे सुरक्षित असुन याचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन पालिकेच्या प्र.मुख्याधिकारी टिना गवळी, लोकनियुक्त नगराध्यक्ष मोहनलाल माळी, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण यांनी केले.
तसेच शहरातील नागरिकांनी सुरक्षिततेसाठी विनामास्क फिरूनये , स्वतः ची व घरातील इतरांची काळजी घेण्याचे आवाहन नगराध्यक्ष माळी यांनी केले आहे.
माझा मास्क ,माझी सुरक्षा.