मयुर रोकडेची जागतिक विद्यापीठ स्तरीय पुरुष धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड

     

    पेठ वडगांव : येथील श्री विजयसिंह यादव महाविद्यालयातील विद्यार्थी मयूर रोकडे याची चेंगडू, चीन येथे होणाऱ्या जागतिक विद्यापीठ स्तरीय पुरुष धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाली. त्याच्या या यशाबद्दल महाविद्यालयात कौतुक व सदिच्छा सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष मा. गुलाबराव पोळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
    यावेळी बोलताना श्री. पोळ यांनी मयूर रोकडे याचे अभिनंदन करून त्याला पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता ओळखून त्या विकसित करण्याचा प्रयत्न करावा, त्यासाठी योग्य सवयी जोपासाव्यात असे आवाहन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मध्ये शाररीक, बौद्धिक व मानसिक क्षमता आहेत जर त्या ओळखून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले केले तर विद्यार्थी यशापर्यंत पोहचू शकतात तेंव्हा त्याची जबाबदारी पालक व शिक्षक यांनी घ्यावी असे प्रतिपादन केले.
    कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्य विजया चव्हाण यांनी मनोगतात महाविद्यालयाची क्रीडा क्षेत्रातील वाटचाल विषद केली. व खेळाडूना महाविद्यालयाच्या वतीने सर्वोतपरी मदत केली जाईल असे सांगितले.
    मयूर रोकडे याचे प्रशिक्षक शांतीनाथ अनुजे यांचाही सत्कार करण्यात आला. श्री अनुजे यांनी विद्यार्थ्यांना खेळातून कशा प्रकारे आपले करियर घडवता याते याचे मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित प्राचार्य प्रदीप पाटील, उपप्राचार्य किरण कोळी, अमेय केर्लेकर, जयकुमार गणपते मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी अभिजित पोळ, राजेंद्र देवस्थळी, डॉ. सी. बी. माने, डॉ. दिनेश भंडारे, प्रा. डी. बी. पाटील, प्रा. रेणुका पवार, प्रा. आर. आर. चव्हाण, डॉ. राजाराम अतिग्रे आदी उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. एस. एम. पाटील यांनी केले, आभार डॉ. एस. व्ही. मस्के व सूत्रसंचालन कु. प्रियांका गुंडवडे व ऋतुजा डोरले यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित  होते.