पंचगंगा नदीतीरी होड्यांच्या शर्यती संपन्न
कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे):-इचलकरंजी शेतकरी तरुण व बेंदूर उत्सव मंडळाच्या वतीने क्रांती दिनाचे औचित्य साधत अनेक वर्षांपासून पंचगंगा नदीत होड्यांच्या शर्यती घेतल्या जात आहेत. प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही शर्यतीला प्रतिसाद मिळून कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील 10 बोट क्लबने सहभाग नोंदविला होता. या भव्य होड्यांच्या शर्यती सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे व कु. सानिका आवाडे यांच्याप्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
तसेच या भव्य होड्यांच्या शर्यतीचा शुभारंभ मा. जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला. या शर्यतीत प्रथम क्रमांक सांगलीवाडी तरुण मराठा बोट क्लब, द्वितीय क्रमांक कसबे डिग्रजच्या श्री जी बोट क्लब, तृतीय क्रमांक इचलकरंजीच्या वरद विनायक बोट क्लब व चौथा क्रमांक समडोळीच्या न्यू शानदार बोट क्लब यांनी मिळविला. याप्रसंगी सहकारमहर्षी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या शुभ हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.
शर्यतीमध्ये चुरस पाहून प्रेक्षकांकडून प्रोत्साहन दिले जात होते. पंचगंगा नदीच्या दोन्ही काठावर तसेच लहान व मोठ्या पुलावर शर्यतप्रेमींची मोठी गर्दी केली होती.
यावेळी ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, अध्यक्ष बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, अजय जाधव, सुनिल पाटील, बाळासाहेब जांभळे, शेखर शहा,उपाध्यक्ष नंदु पाटील, पापालाल मुजावर, राजेंद्र बचाटे, राहुल घाट, राजू बोंद्रे, दिपक सुर्वे, सतीश मुळीक, नितेश पोवार, शांताप्पा मगदूम, शिवाजी काळे, तानाजी कोकितकर, सागर गळतगे, शिवाजी माळी, सागर मगदूम, किशोर पाटील, डॉ. विजय माळी, श्रीकांत कगुडे, अग्नु लवटे, सागर कम्मे, प्रितम गुगळे, राजू पुजारी आदींसह मान्यवर व शर्यत प्रेमी उपस्थित होते.