शाळांचे खाजगीकरण थांबवा, इ.ना.मंच.

    इचलकरंजी : नगरपरिषदेच्या शाळातुन सर्वसामान्य विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे याकरिता खासदार धैर्यशील माने यांनी पुढाकार घेतला असून निधी उपलब्ध करून देणार आहेत. शिक्षण समिती मार्फत प्रकल्प आराखडा करण्याचे काम सुरू असुन या परिस्थितीत नगरपरिषद इमारतीतील शाळांचा मुदतवाढीचा येत्या सभेसमोरील प्रस्ताव रद्द करावा तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत नागरिकांचे लचके तोडत असताना आपण बघत बसणार काय? आशा आशयाचे निवेदन प्र.मुख्याधिकारी शरद पाटील यांना इचलकरंजी नागरिक मंचतर्फे देण्यात आले.
    यावेळी मुख्याधिकारी यांनी शाळेच्या खाजगीकरण व मुदतवाढीबाबत सभेत म्हणणे मांडून निर्णय घेणार असल्याचे मुख्याधिकारी यांनी तसेच निर्बीजीकरण प्रस्ताव सभेसमोर ठेवणार असल्याचे आरोग्य अधिकारी सुनिलदत्त संगेवार यांनी सांगितले.
    यावेळी इनामचे राजु कोंनूर,अमित बियाणी,राजुदादा आरगे,उदयसिंह निंबाळकर,महेंद्र जाधव,सचिन बाबर,विद्यासागर चराटे,धैर्यशील कदम,राजेश बांगड,आप्पासाहेब पाटील,प्रवीण शिरगुप्पे,हरीश देवाडिगा,रावसाहेब चौगुले,अमृत पारख,अभिजित पटवा उपस्थित होते.निवेदनाच्या प्रति नगराध्यक्ष तसेच विरोधी पक्ष नेते प्रकाश मोरबाळे यांनाही देण्यात आल्या आहेत.