प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय उपयोगी साहित्य वाटप

    प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय उपयोगी साहित्य वाटप

     

     

     

    चिकुर्डे, (प्रतिनिधी):- चिकुर्डे (ता.वाळवा) येथे जिल्हा परिषद प्राथमिक मुलांच्या मुलींच्या शाळेत राजारामबापू कारखान्याचे चेअरमन युवा नेते प्रतीक पाटील तथा दादासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा तालुका वारकरी संघटनेच्या वतीने ह.भ.प. भीमराव पवार यांच्या हस्ते शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले गोरगरीब प्राथमिक शाळेतील मुलांना शालेय उपयोगी साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्याकडून व मुख्याध्यापक पुष्पलता पाटील यांनी वाळवा तालुका वारकरी संप्रदाय व अध्यक्ष प्रताप पाटील यांच्या या उपक्रमाचे स्वागत व अभिनंदन व्यक्त करण्यात आले प्रतिवर्षीप्रमाणे युवा नेते प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पाटील यांच्याकडून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात लहान मुलांना खाऊ वाटप वही वाटप शालेय साहित्य वाटप करण्यात येते यावर्षी चिकुर्डे चे वारकरी संप्रदायातील ह भ प भीमराव पवार महाराज यांच्या हस्ते वही वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना वारकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पाटील म्हणाले की सप्तपदी आमदार जयंतराव जी पाटील साहेब तसेच युवा नेते राजारामबापू कारखान्याचे चेअरमन प्रतीक पाटील दादासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्रती वर्षी आम्ही वाळवा तालुका वारकरी संप्रदायाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतो मराठी शाळेतील गरीब मुलांना वही वाटप करून त्यांना छोटीशी मदत करण्याचा प्रयत्न वारकरी संप्रदायाने केला आहे माजी मंत्री सप्तपदी आमदार जयंतराव जी पाटील साहेब व प्रतीक पाटील यांची नेहमीच चिकुर्डे गावच्या विकासासाठी नेहमीच झुकते माप असते त्याचबरोबर चिकुर्डे हे गाव राजारामबापू कारखाना कार्यक्षेत्र नसतानासुद्धा चिकुर्डे गावातील शेतकऱ्यांना झुकते माप देऊन जयंत पाटील व प्रतीक पाटील यांनी कायमच मदत केली आहे याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजारामबापू दूध संघाचे संचालक दिलीप खांबे भाऊ तसेच उल्हास पतसंस्थेचे चेअरमन माजी सरपंच बाळासाहेब पाटील ह भ प भीमराव पवार जिल्हा मागासवर्गीय राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष जंबू पांढरबळे वाळवा तालुका सोशल मीडियाचे सदस्य शुभम माने रंगराव कांबळे देवर्डे चे सरपंच अनंत पाटील मुख्याध्यापिका सौ पुष्पलता पाटील शिक्षक सुधीर बनसोडे चंद्रशेखर पाटील शिक्षक पुनम चव्हाण माया पाटील व विद्यार्थी उपस्थित होते स्वागत मुख्याध्यापिका पुष्पलता पाटील यांनी केले आभार शिक्षक सुधीर बनसोडे यांनी मानले फोटो चिकुर्डे जिल्हा परिषद शाळेत शालेय वस्तू वही वाटप करताना ह भ प भीमराव पवार दिलीप खांबे बाळासाहेब पाटील प्रताप पाटील शिक्षक व इतर