Home कोल्हापूर जिल्हा वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ; कांदे-बच्चे सावर्डे रस्ता पाण्याखाली

वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ; कांदे-बच्चे सावर्डे रस्ता पाण्याखाली

वारणा नदीच्या पाणीपातळीत वाढ; कांदे-बच्चे सावर्डे रस्ता पाण्याखाली

कोल्हापूर-सांगलीला जोडणाऱ्या रस्त्यावर पाणी

मोहरे-सातवे,आरळे-सातवे रस्त्यांवरील वाहतूक ठप्प

 

बच्चे सावर्डे : प्रतिनिधी सुनिल पाटील

वारणा नदीचे पाणी कोल्हापूर, सांगली या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर पहिल्यांदा आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. चार दिवसांपासून चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे वारणा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे.

सातवे, सावर्डे, आरळे, आमतेवाडी, वाळके वाडी, शिंदेवाडी, सागाव, कांदे, बिऊर आदी गावांतील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

वारणा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाल्याने कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना जोडणारा कांदे, बच्चे सावर्डे रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक

बंद झाली आहे.चिकुर्डे – वारणानगर यामार्गे वाहतूक सुरू आहे, तसेच मोहरे- सातवे आणि आरळे-सातवे रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली.