सोमवारपेठ येथील धोकादायक विजेचे खांब सुस्थितीत उभारावेत – डॉ.अभिजीत जाधव 

    सोमवारपेठ येथील धोकादायक विजेचे खांब सुस्थितीत उभारावेत – डॉ.अभिजीत जाधव

     

    पन्हाळा,(प्रतिनिधी):- सोमवारपेठ येथील रस्त्यालगत धोकादायक परिस्थितीत झुकलेले विजेचे खांब सुस्थितीत उभारण्याची मागणी रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूर चे अध्यक्ष डॉ.अभिजीत जाधव यांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे केलेली आहे.

    राक्षी ते घुंगूर मार्गावर सोमवारपेठ गावच्या हद्दीमधे मुख्य रस्त्याशेजारी विजेचे खांब झुकलेल्या स्थितीमधे धोकादायक पद्धतीने उभे आहेत.या मार्गावरुन चाकरमानी प्रवास करीत असतात.डोंगरभाग असल्यामुळे येथे सोसाट्याचा वारा वाहत असतो,तसेच पावसाचं प्रमाणही ज्यास्त असल्यामुळे हे धोकादायक अवस्थेत झुकलेले विजेचे खांब कोणत्याही क्षणी रस्त्यावर पडून विजेच्या तारेचा स्पर्श होऊन एखादी जिवीतहानी होण्याची शक्यता असल्याने हे धोकादायक अवस्थेतीत खांब सरळ आणि सुस्थितीत करण्याची मागणी रस्ते सुरक्षा अभियान कोल्हापूर चे अध्यक्ष डॉ.अभिजीत जाधव यांनी संबंधित विभाग आणि प्रशासनाकडे केलेली आहे.