निलेवाडी ऐतवडे खुर्द पूल पाण्याखाली ; वाहतूक बंद
नवे पारगाव, (प्रतिनिधी):- गेले काही दिवस वारणा नदी धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे गेले काही दिवस स्थिर असणारी पाणी पातळी आज दुपारपासून वाढून निलेवाडी- ऐतवडे खुर्द फुल पाण्याखाली गेला असून सदर पुलावरील वाहतूक बॅरिकेट लावून बंद करण्यात आली आहे गेले काही दिवस वारणा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीला पूर आला आहे त्यामुळे निलेवाडी ऐतवडे खुर्द पूल पाण्याखाली गेला आहे . दरम्यान पोलीस प्रशासन व महसूल प्रशासन अलर्ट वर आहे तहसीलदार कल्पना ढवळे परिक्षाधीन तहसीलदार महेश खिलारे पोलीस निरीक्षक विलास भोसले मंडलआधिकारी अमित लाड तलाठी शैलेश कुईंगडे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुभाष भापकर यांनी भेट देऊन योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले तसेच पुलावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले. व फुल वाहतुकीस बंद करण्यात आला तसेच ग्रामपंचायतच्या वतीने सर्व नागरिकांना सूचना देऊन संभाव्य पूर परिस्थिती उद्भवली तर आपलं संसार उपयोगी साहित्य व्यवस्थित ठेवून महत्त्वाची कागदपत्र व मौल्यवान साहित्य घेऊन सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा असे सूचना देण्यात आल्याचे आहे सरपंच माणिक घाटगे व उपसरपंच शहाजी बोरगे यांनी सांगितले. की नागरिकांच्या राहण्याची सोय श्री विलासराव कोरे इंटरनॅशनल स्कूल मध्ये वजनावरांची सोय वारणा दूध संघाच्या पोल्ट्री शेडमध्ये केलेले आहे त्यामुळे पूर परिस्थिती उद्भवलीच तर नागरिकांनी स्थलांतर करावे असे आवहान ग्रामपंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.