फुलेवाडी येथे “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” नोंदणीसाठी कॅम्प संपन्न महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
कोल्हापूर, (प्रकाश कांबळे):-गेल्या काही दिवसांपासून राज्य शासन महिलांना थोडं आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण”ही योजना जाहीर केली व त्याचा जी आर पावसाळी अधिवेशनात तात्काळ मंजूर करण्यात आला व ही योजना महिलांच्या पर्यंत पोहोचविण्यासाठी सरकारने काही कागदपत्रांची पूर्तता करून ऑनलाईन अर्ज करण्यास दाखल करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत ही योजना महिलांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासनासह अनेक राजकीय पक्ष जोर घेत असताना कोल्हापूर शहरातील पहिली महिला संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य असंघटीत क्षेत्र कामगार संघटना महिला आघाडीच्या वतीने फुलेवाडी येथे कोल्हापूर शहर अध्यक्षा सुप्रिया गोरे यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून घेऊन कोल्हापूर जिल्ह्यात एक आदर्श निर्माण केला आहे या योजनेच्या नोंदणीसाठी जवळपास शेकडो महिलांनी प्रतिसाद दिला व या कॅम्प कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी केली महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून सुप्रिया गोरे म्हणाल्या की सामाजिक बांधिलकी म्हणून हा नोंदणी कॅम्प आयोजित करण्यात आला होता इथून पुढे सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी आमची संघटना सदैव तत्पर राहील यावेळी आर्य समाज संघटना अध्यक्षा निर्मला कुराडे यांनी ही महिलांना मार्गदर्शन केले या कॅम्पला अंगणवाडी सेविका अलका पाटील अनुराधा पेंधणेकर, महात्मा फुले युवक नागरी पतसंस्था चेअरमन श्रीकांत पोवार, संस्थापक नामदेव लवटे, संचालक अनिल बोडके, राधिका सावंत शैलेजा पोतदार ताहिल शहनशहा अनिल बोडके तौशिफ सय्यद यांच्या सह भागातील शेकडो महिला उपस्थित होत्या.