कवठेसारमध्ये शरद कृषीकन्यांकडून एकात्मिक तण व्यवस्थापनाचे मार्गदर्शन
कुंभोज,प्रतिनिधी (विनोद शिंगे):-कवठेसार येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत शरद कृषी महाविद्यालय जैनापूर यांच्यावतीने ग्रामीण कृषी जागरूकता आणि कृषी औद्योगिक जोड कार्यक्रम अंतर्गत तणामुळे होणारे पीक नुकसान लक्षात घेऊन कृषी कन्यांनी एकात्मिक तण व्यवस्थापन यावर प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी कृषीकन्यांनी पारंपारिक आणि रासायनिक पद्धत याबद्दल सखोल मार्गदर्शन केले आणि शेतकऱ्यांना कोणत्या प्रकारचे रासायनिक तणनाशक कोणत्या प्रकारच्या तणासाठी वापरावे तसेच वापरण्याचे प्रमाण आणि घ्यावयाची काळजी याबद्दल शास्त्रीय माहिती दिली. यावेळी महाविद्यालयाच्या कृषीकन्या ऋतुजा चौगुले, राजनंदिनी हिरुगडे, सानिका पाटील, उत्कर्षा पाटील, वैष्णवी संकपाळ, शितल ठिकणे यांनी प्रात्यक्षिक घेतले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्या डॉ.एस .आर .कोळी ,उपप्रचार्य एस. एच. फलके, कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. टी. कोळी व कृषी विद्या विभागाचे प्रा.डी.एस.मुंडफणे यांचे मार्गदर्शन लाभले.