नीट २०२१ परीक्षा १ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार

    मुंबई : राष्ट्रीय पात्रता किंवा प्रवेश चाचणी किंवा एनईईटी नीट २०२१ परीक्षा १ ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आपल्या अधिकृत वेबसाईट nta.ac.in वर एमबीबीएस प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर केली आहे.

    परीक्षेसाठी अर्ज लवकरच सुरू होईल. एमबीबीएस / बीडीएस कोर्समध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी प्रवेश पोर्टल ntaneet.nic.in वर नोंदणी करावी लागेल.

    नीट २०२१ हे पेन आणि पेपर पद्धतीने आणि वर्षामध्ये फक्त एकदा आयोजित केले जाईल.पदवीधर वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांचे वय १७ ते २५ वर्षे असणे आवश्यक आहे आणि बारावी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डमधून मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजीमध्ये समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.