Home शैक्षणिक दिलीपसिंह यादव विद्यालयाचे विजयंता सावंत, बाळासाहेब शिरसाट आदर्श पुरस्काराने सन्मानित

दिलीपसिंह यादव विद्यालयाचे विजयंता सावंत, बाळासाहेब शिरसाट आदर्श पुरस्काराने सन्मानित

दिलीपसिंह यादव विद्यालयाचे विजयंता सावंत, बाळासाहेब शिरसाट आदर्श पुरस्काराने सन्मानित

 

 

पेठ वडगाव : आनंदगंगा फाउंडेशन च्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक / लिपिक पुरस्कार श्री दिलीपसिंह यादव माध्यमिक विद्यालयाचे विजयंता सावंत सर व बाळासाहेब शिरसाट सर यांना आनंदगंगा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.तानाजी पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल पेठ वडगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा श्रीम.दीपलक्ष्मी यादव, सचिव श्री गुरुप्रसाद यादव, संचालिका सौ.प्रियांका पाटील-यादव, श्री दिलीपसिंह यादव माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मनीषा यादव या सर्वांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

यावेळी श्री दिलीपसिंह यादव माध्यमिक विद्यालय व समर्पण इनोव्हेटिव्ह स्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.