विंग्ज क्रिकेट अँकडेमीच्या तीन विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय निवड

     

    घुणकी:प्रतिनिधी कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोशिएशनच्या वतीने १२ वर्षाखालील सन २०२०-२१ हंगामासाठी जिल्हा क्रिकेट संघासाठी नुकत्याच पार पडलेल्या निवड चाचणीतुन एकुण ३७ खेळाडुंची निवड झाली असुन ग्रामीण भागातील नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील विंग्ज क्रिकेट स्पोर्टस् अॅकॅडेमीच्या संस्कार संदीप सोने,वेदांत संजय पाटील व विश्वराज राजेंद्र डंबे या तीन खेळाडुनी आपल्या गुणवत्तापुर्ण क्रिकेटच्या झालेल्या सराव निवड चाचणीतुन बाजी मारत या प्रथम निवडीत आपले स्थान पक्के केले आहे.यशस्वी विद्यार्थ्यांना विंग्ज क्रिकेट स्पोर्टस् अॅकॅडेमीचे प्रशिक्षक रोहीत डंबे व खेळाडूंचे पालक यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
    कोल्हापूर येथील राजाराम महाविद्यालय मैदानावरती सदर निवड सराव चाचणी झाली असुन यातुन निवडलेल्या खेळाडुंच्या पुढील नियोजीत स्पर्धा चाचणीतुन अंतीम संघ निवडला जाणार आहे. ग्रामीण परीसरातील विंग्ज क्रिकेट स्पोर्टस् अँकडेमीच्या कामगिरीमुळे प्रशिक्षक रोहीत डंबे व खेळाडूंचे सर्वञ कौतुक होत आहे.

    फोटो: १).संस्कार सोने,२).वेदांत पाटील, ३).विश्वराज डंबे