घुणकी : तळसंदे (ता हातकणंगले) येथील आनंदा ज्ञानू नाईक (वय 75) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. येथील बिरदेव मंदिराच्या पाठीमागील असणाऱ्या झाडास पहाटे दोरीच्या साह्याने आत्महत्या केली . ते बिरदेव मंदिरामध्ये नेहमी नित्यनियमाने जात असत. परंतु सकाळी आत्महत्या केल्याचे नागरिकांच्या निर्दशनास आले .आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. नवे पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. अनिता शहा यांनी शवविच्छेदन केले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली ,सुना ,नातवंडे असा परिवार आहे .पेठ वडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष माने व राजेंद्र पाटील पुढील तपास करीत आहेत.