एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाती बातमी आहे. एमपीएससीने परीक्षेबाबत महत्वाची घोषणा केली आहे. यावर्षी मार्च महिन्यात होणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. १४ मार्च रोजी ही परीक्षा होणार होती. दरम्यान या परीक्षेच्या तारखा गेल्या दीड वर्षात पाचव्यांदा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे परीक्षार्थी नाराज आहेत. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि त्यानंतर कोरोना साथीचं कारण देत ही परीक्षा अनिश्चित काळासाठी लांबणीवर गेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी करत माहिती दिली आहे. राज्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी अनेक जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमिवर ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे या प्रसिद्धीपत्रकात नमुद करण्यात आले आहे. ही परीक्षा कधी होणार याबाबत लवकरच तारीख जारी केली जाईल, असेही यात म्हटले आहे.