शिवशाही बस चिखलात अडकल्याने दीड तास प्रवासांची गैरसोय

    गंगाखेड : (प्रतिनिधी) काल झालेल्या पावसाने गंगाखेड बस स्थानकाला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. या पावसाचा परिणाम दुसऱ्या दिवशी बस स्थानकात जाणवला बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच परभणी- लातूर ही शिवशाही बस सकाळी साडेसहा वाजता आली असता प्रवेशद्वाराला निर्माण झालेल्या चिखलात फसली ही बस चिखलात फसल्याने तब्बल दीड तास या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. बसस्थानकातील बस प्रवासी दीड तास झाले तरी बस एकही बस स्थानकाच्या बाहेर निघाले नाही. शेवटी उड्डाण फुलाचा सहारा घेत बाहेरगावाहून येणाऱ्या बसला त्या ठिकाणी वळण देऊन मार्गस्थ करण्यात आल्या.
    सकाळची वेळ असल्याने कामावर जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली .शेवटी आगारातील कर्मचारी यांनी दुसऱ्या बसच्या सहाय्याने बसला टोच्या लावून बस चिखलाच्या बाहेर काढली.