पोषण माह अंतर्गत उंड्री अंगणवाडीमधे वृक्षारोपण संपन्न

     

    पन्हाळा :  लहान बालकांच्या वाढीसाठी पोषक आहार मिळणं अत्यंत गरजेचं असतं.प्रथिने,स्निग्धपदार्थयुक्त आहार बालकांच्या पोषणवाढीसाठी महत्त्वाचा असतो.
    उंड्री अंगणवाडी क्र.200,304,24 मधे आज ग्रुरुवार दि.2/9/2021 रोजी पोषण आहार माह साजरा करण्यात आला.यामधे उंड्री उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत जाधव यांनी बालकांसाठी पोषण आहाराचं महत्त्व मातांना समजावून सांगितलं.
    तसेच डॉ.अभिजीत जाधव यांच्या हस्ते पर्यावरण संदेश म्हणून वृक्षारोपणही करण्यात आलं.
    याप्रसंगी उंड्री उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत जाधव,अंगणवाडी सेविका सुजाता गवळी,रेखा चव्हाण,अरुणा यादव,सरिता सुतार,संपदा सुतार,आशा सुनिता कालेकर,परिचारिका कविता भोसले,आरोग्य सेवक संदीप पाटील,मदतनीस रंजना कांबळे आदी उपस्थित होते.