सत्ताधारी भाजपाच्या विरोधात राष्ट्रवादीचे महापालिकेवर तीव्र आंदोलन

    पुणे : पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाची सत्ता आहे , मागील काही दिवसांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून स्थायी समिती अध्यक्ष एडवोकेट नितीन लांडगे यांना व त्यांच्या अधिकार्‍यांना या प्रकरणात अटक करण्यात आले होते. भाजप भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज पिंपरी मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून महापालिकेवर तीव्र मोर्चा काढण्यात आला. यावेळी आगळ्यावेगळ्या पद्धतीने मोर्चा काढण्यात आला ,एका हात गाड्यावर ‘धरा धाम पण करा काम ‘और खाऊ गल्ली आशा नावाचे पोस्टर लावण्यात आले होते, व त्यात मोठ्या प्रमाणात नकली नोटा ठेवण्यात आले होते, यामध्ये शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्ष नेते राजू मिसाळ, माजी महापौर योगेश बहल, वैशाली घोडेकर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे ,नगरसेवक अजित गव्हाणे, मयूर कलाटे, विक्रांत लांडे, समीर मासुळकर, राजू बनसोडे ,नगरसेविका पूर्णिमा सोनवणे, निकिता कदम, संगीता ताम्हाणे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, जगदीश शेट्टी, अतुल शितोळे, काळुराम पवार, जगन्नाथ साबळे ,प्रवक्ते फजल शेख, युवती शहराध्यक्ष वर्षा जगताप ,भोसरी विधानसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील लांडगे ,यांच्यासह आजी -माजी नगरसेवक व मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते