नवे पारगाव : (संतोष जाधव) निलेवाडी (ता.हातकणंगले) संपूर्ण गाव पुरबाधित असुन पुनर्वसन प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयात मा. जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार , आमदार राजूबाबा आवळे व खासदार धैर्यशील माने व निलेवाडी पूरग्रस्त ग्रामस्थ प्रतिनिधी यांची बैठक झाली. त्यावेळी बोलताना निलेवाडीच्या लोकभावना राज्य शासनापर्यंत पोहचवून लवकरात लवकर निलेवाडीच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवू असे जिल्हाधिकारी रेखावार सांगितले तसेच निलेवाडी ग्रामस्थांच्या सर्व समस्या मा. जिल्हाधिकारी रेखावार यांनी समजवून घेतल्या व निलेवाडीच्या पुनर्वसनाचा प्रश्न अग्रक्रमाने सोडवला जाईल असे सांगितले तसेच या प्रश्नावर आमदार राजूबाबा आवळे खासदार धैर्यशील माने व ग्रामस्थ प्रतिनिधी यांच्याशी दोन तास सर्व पर्यायावर व्यापक चर्चा केली व या प्रश्नावर मार्ग काढणार असे सांगितले . यावेळी स्थानिक आमदार राजूबाबा आवळे म्हणाले निलेवाडी गाव नेहमी पुरबाधित असून निलेवाडी गावचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे तसेच पुरस्तिथीत बाहेर जनावरे बाहेर काढण्यासाठी चिकुर्डे पुलाजवळ मोठा पूल होणे गरजेचे आहे ही दोन्ही कामे तात्काळ होणे गरजेचे आहे. यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही कोठेही कमी पडणार नाही आम्ही शासन स्थरावर जी लागेल ती मदत करायला तयार आसलेचे व गावकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आम्ही शासन दरबारी प्रयत्न करणार आहे असे सांगितले. तसेच पुनर्वसनासाठी निलेवाडीच्या सोयीने खासगी जमीन किंवा गायरान जमीन ताब्यात घेऊन ती जमीन पुनर्वसनासाठी वापरता येईल व या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघेल अशी भावना व्यक्त केली. यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी महापूर काळात जनावरांचे होणारे हाल व संभाव्य वाढत जाणारी पुरपरिस्तिथी याचा अभ्यास करता निलेवाडी गावच संपूर्ण पुनर्वसन करणे गरजेचे आहे हे सांगितले व तसे प्रयत्न लवकरात लवकर सुरु करण्याविषयी सूचना केल्या. तसेच यावेळी खासदार धैर्यशील माने यांनी निलेवाडीच पुनर्वसन सोप्या पद्धतीने कसे करता येईल याची माहिती जिल्हाधिकारी यांना दिली तसेच गेली कित्येक वर्षे निलेवाडी गाव महापुरग्रस्त असून जुन्या नियमात शिथिलता देऊन गावच पुनर्वसन करावं अशी मागणी केली प्रत्येक वेळी पूर आला की शासनाने मदत देण्यापेक्षा एकदाच पुनर्वसन करावे असेही सांगितले। आमदार राजूबाबा आवळे व खासदार धैर्यशील माने यांनी निलेवाडी ग्रामस्थांच्या जन भावनेचा आदर करून प्रसासनाने लवकरच पुनर्वसन प्रश्न सोडवण्याचा आराखडा तयार करावा अशी सूचना केली . यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन मा सुभाष भापकर यांनी 1953 ते आजअखेर प्रत्येक वेळी शासनाने आश्वासन दिले परंतु 2021 चा महापूर सर्व प्रकारे विध्वंसक होता त्यामुळे निलेवाडीच रखडलेल पुनर्वसन गावापासून जवळ आंबिलटेक येथेच करावे अशी मागणी केली. तसेच सदर पुनर्वसन करत असताना आज अनेक लोकांनी दोन तीन मजली इमारती बांधल्या आहेत त्याचा विचार करून लोकांना पर्यायी जागा द्यावी अशी मागणी केली.यावेळी विनयरावजी कोरे दूध संस्थेचे चेअरमन श्री बाबासाहेब माने यांनी शासनाने आंबिलटेक येथील वारणा दूध संघाची जागा जी आगोदरच आमदार विनयराव कोरे यांनी निलेवाडी पूरग्रस्त नागरिकांना शासन नेमाने द्यायला तयार आहेत असे सांगितले आहे, ती शासनाच्या नियमानुसार संपादित करून पुनर्वसासाठी वापरावी असे सांगितले. यावेळी मा सुभाष भापकर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वडगाव मा बाबासाहेब माने चेअरमन विनयरावजी कोरे दूध संस्था , उपसरपंच तानाजी जाधव निलेवाडी, शहाजी बोरगे चेअरमन जयभवानी दूध संस्था, माणिक घाटगे चेअरमन हनुमान सह दुधसंस्था , माजी उपसरपंच वसंत खोत ,श्री संतोष जाधव , श्री वसंत शिंदे , श्री मानसिंग घाटगे हे उपस्तीत होते.
🔲निलेवाडीच्या पुनर्वसनासाठी आमदार राजूबाबा आवळे व खासदार धैर्यशील माने यांचे शर्तीचे प्रयत्न गावकऱ्यांच्या व्यथा शासनासमोर मांडणार.