वडगांवमधील व्यापाऱ्याची नैराशातुन आत्महत्या

     

    पेठ वडगांव : येथील बिरदेव चौकातील नामांकीत नाझरे बंधू यांचे कृष्णा बँग्ज या दुकानात सुर्यकांत महादेव नाझरे (वय ५५वर्षे ) या व्यापाऱ्याने सिलींग फँनला नायलाँन दोरीच्या साह्यायाने गळफास लावुन आत्महत्या केली.
    सविस्तर माहीती अशी सुर्यकांत नाझरे रा.यादव काँलनी पेठ वडगांव ता.हातकणंगले यांचे बिरदेव चौक येथे कृष्णा बँग्ज नावाचे दुकान आहे.ते आज सकाळी ९ वाजता नेहमीप्रमाणे दुकान उघडणेसाठी आले व साफसफाई करून पुन्हा दुकानाचे शटर बंद करून त्यांनी दुकानात नैराशातुन नायलाँनच्या दोरीच्या साह्यायाने गळफास घेऊन आत्महत्या केली. दुकान उघडून परत बराच वेळ बंद असल्याने सदरचा प्रकार तेथील रिक्षा चालकाच्या लक्षात आल्याने तात्काळ नंदकिशोर नाझरे यांना कळविले.
    अद्याप आत्महत्येचं नेमके कारण समजु शकले नाही.
    घरामध्ये कसलाही वादविवाद व तंटा तसेच कसलेही कर्जाचे दडपण नव्हते तरी त्यांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले यामुळे त्यांच्या परिवारातुन व व्यापारी वर्गातुन हळहळ व्यक्त होत आहे.
    त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व विवाहीत मुलगी व चार भांवडे असा मोठा परिवार आहे.
    अधिक तपास वडगांव पोलिस ठाण्याचे पो.हे.काँ. दुकाने , व रेणूशे करीत आहेत.