लग्न सोहळ्यासाठी निघालेल्या चौरे कुटुंबातील तिघांचा अपघातात मृत्यू ,दोघे गंभीर

     

    कल्याण : एका लग्न कार्यक्रमासाठी चार चाकी वाहनातून जळगांवकडे जाणाऱ्या कल्याण पूर्वे मधील एकाच कुटुंबातील ४ पैकी ३ सदस्यांचा अपघाती मृत्यु झाला आहे . गुरुवारी दुपारी मुंबई आग्रा महामार्गावर झालेल्या या अपघातात पोलिस खात्यात नोकरीस असलेले पंडित चौरे यांची पत्नी , मुलगा आणि मुलगी असे ३ जण मुत्य मुखी पडल्याच्या या दुदैवी घटनेने कल्याण पूर्वेतील विजय नगर परिसरात शोककळा पसरली आहे . या अपघातात पोलिस कर्मचारी श्री.पंडीत चौरे आणि वाहन चालक ही गंभीर जखमी झाले असून त्यांचेवर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत .
    मुंबई-आग्रा महामार्गावरील कोकणगांव फाट्याजवळ हा अपघात झाला . कल्याणहून जळगावकडे निघालेल्या चौरे कुटूंबियांचे चार चाकी वाहन रस्त्यालगत उभ्या असलेल्या एका सिंमेटच्या ट्रक वर आदळले याच दरम्यान पाठीमागून येणाऱ्या एसटीबस चालकाचेही बसवरचे नियंत्रण सुटल्याने या बसनेही या चार चाकी वाहनाला मागून जोरात धडक दिली. या तिन वाहनांच्या विचित्र अपघातामधे चारचाकीत असलेल्या १९ वर्षीय मयुरी चौरे या युवतीचे घटनास्थळी जागीच मृत्यू झाला तर श्री. पंडीत चौरे यांच्या पत्नी वैशाली चौरे आणि २२ वर्षाचा मुलागा सागर चौरे यांचे उपचारादरम्यान निधन झाले .
    सागर हा कळव्याला एका खाजगी कंपनीत इंजिनीअरिंगचा जॉब करत होता तर मयुरी चौरे ही नुतन ज्ञान मंदिर शाळेची माजी विद्यार्थिनी असून ती सध्या पेंढारकर कॉलेज मध्ये १२वीचे शिक्षण घेत होती .
    श्री. पंडीत चौरे यांचे हे कुटूंब बहीणीच्या मुलाच्या लग्नासाठी जळगाकडे चालले होते . शुक्रवारी हळद तर रविवारी लग्न होते . परंतु या कुटूंबीयावर लग्न स्थळी पोहचण्या पूर्वीच नियतीने एकाच कुठूंबातील तिन सदस्यावर घाला घातल्याने कल्याण पूर्व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

    प्रतिनिधी आनंद गायकवाड ,मुंबई .