वडगांव : वाठार तर्फ वडगांव येथील अशोकराव माने कॉलेज परिसरात रोहीत शिंदे यांचे हॉटेल आहे. या हाँटेलच्या जागेवरून शिंदे आणि अशोकराव माने महाविद्यालयाचा वाद आहे. बुधवारी सकाळी माने कॉलेजचे सुतार व त्यांचे सहकारी या दोघांनी हाँटेल मालक रोहित शिंदे यांच्या हॉटेलसमोर येऊन या जागेवर विजयसिंह माने काँलजचे क्रीडांगण तयार करणार आहोत. त्यामुळे तुझे हॉटेल काढून घे असे म्हणत जातिवाचक शिवीगाळ केली.
अशोकराव माने काॅलेजचे शिक्षक व शिपाई यांनी जातिवाचक शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी वडगांव पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
फिर्यादी रोहित राजू शिंदे रा.पेठ वडगांव यांनी दिली. याप्रकरणी अतुल सुतारसह अन्य सहकारी यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजाणे करीत आहेत.