Home कोल्हापूर जिल्हा पेठ वडगावात शनिवारी लोकअदालतीचे आयोजन

पेठ वडगावात शनिवारी लोकअदालतीचे आयोजन

पेठ वडगावात शनिवारी लोकअदालतीचे आयोजन

 

 

 

पेठ वडगाव : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कोल्हापूर यांच्या आदेशानुसार तालुका विधी सेवा समिती, पेठ वडगाव यांच्या वतीने शनिवार दि.14 डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवाणी व फौजदारी न्यायालय, पेठवडगांव येथे सकाळी 10.30 ते दुपारी 04 वाजेपर्यंत लोकन्यायालयाचे कामकाज चालणार असून नागरीकांनी या न्यायालयात प्रलंबित असणारी तसेच दाखलपूर्व प्रकरणे आपापसांत तडजोडीने मिटविण्याकरीता या लोकअदालतीचा लाभ घ्यावा व आपला वेळ, परीश्रम व पैशाची बचत करावी, असे आवाहन दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर (पेठवडगाव) एल.एम.पठाण यांनी केले आहे.