Home कोल्हापूर जिल्हा डीवायपी कृषी विज्ञान केंद्रामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ-डॉ. सतीश पावसकर

डीवायपी कृषी विज्ञान केंद्रामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ-डॉ. सतीश पावसकर

डीवायपी कृषी विज्ञान केंद्रामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ-डॉ. सतीश पावसकर

-नवतेजस्विनी महिला शेतकरी संस्थेतर्फे महिला मेळावा संपन्न

तळसंदे,(प्रतिनिधी):-डी.वाय.पाटील DYP एज्युकेशन सोसायटीच्या तळसंदे येथील कृषी विज्ञान केंद्रामुळे शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, बाजारपेठेतील संधी आणि आर्थिक व्यवस्थापन क्षमता प्राप्त झाली आहे. या केंद्राच्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर डॉ. सतीश पावसकर यांनी केले. राष्ट्रीय सहकार विकास निगम आणि डी वाय पाटील कृषी विज्ञान केंद्र – महिला आर्थिक विकास महामंडळ संचलित नवतेजस्विनी महिला शेतकरी उत्पादक सहकारी संस्था मर्यादित हातकणंगलेच्या वार्षिक सर्वसाधारण सभा व महिला मेळावा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

 

यशस्विनी ऍग्रो प्रोडूसर कंपनी लिमिटेड बोरामणी (सोलापूर)च्या चेअरमन सौ. अनिता योगेश माळगे, महिला आर्थिक विकास महामंडळ जिल्हा प्रकल्प सल्लागार सुजाता कणसे, नवतेजस्विनी महिला शेतकरी उत्पादक सहकारी संस्थेच्या चेअरमन शोभादेवी रामराव पाटील, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिजीत ढाले यांची प्रमुख उपस्थिती होती

 

जयवंत जगताप म्हणाले, राष्ट्रीय सहकारी विकास निगम पुणे, कृषी विज्ञान केंद्र तळसंदे व महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर यांच्या मदतीने कोल्हापुरातील पहिली महिला शेतकरी सहकारी उत्पादक संस्था स्थापन झाली असून आज ३६५ महिला सभासद कार्यरत आहेत. या संस्थेला केंद्र सरकारच्या इक्विटी ग्रँड तसेच मॅनेजमेंट कॉस्ट अनुदानद्वारे विविध उपक्रम राबविण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र प्रशिक्षण तसेच नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देत आहे. पुढील काळात महिला सहकारी संस्थेच्या माध्यमातून एक नवीन उद्योग उभा राहील ज्यातून महिलांना रोजगार मिळेल व त्यांच्या मालाला योग्य तो भाव मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

प्रमुख वक्त्या अनिता योगेश माळगे म्हणाल्या, महिलांना सामूहिकरित्या एकत्र आणून उत्पादन विक्री आणि आर्थिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी शेतकरी उत्पादक संस्थेची गरज आहे. यामध्ये विविध कौशल्य तसेच तंत्रज्ञांचा वापर, नवीन कृषी पद्धती आणि बाजारपेठेतील क्षमता वाढविण्यासाठी मार्गदर्शन दिले जाते. कोल्हापुरी मिरची व गुळा सारख्या पदार्थांचे मार्केटिंग करून या संस्थेने पुढे जावे असे आवाहन त्यांनी केले.

 

यावेळी केंद्र सरकारच्या इक्विटी ग्रँड योजने अंतर्गत महिलांनी गुंतवलेल्या २ हजारच्याच्या शेअर्सच्या बदल्यात ४ हजार रकमेचे शेअर सर्टिफिकेट सर्व सभा सभासदांना वितरित करण्यात आले. यावेळी हातकणंगले तालुक्यातील २८५ महिला सभासद उपस्थित होत्या. या कार्यक्रम साठी कृषी विज्ञान केंद्र, तळसंदे चे सर्व अधिकारी, उन्नती,प्रेरणा,आधार, एमकेवीजी, सीएमआरसी, सहयोगीनी व सीआरपी यांचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन व आभार राजवर्धन सावंत भोसले यांनी केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी पाटील व विश्वस्त मा. आ. ऋतुराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

 

तळसंदे- महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना डॉ. सतीश पावसकर. यावेळी जयवंत जगताप, सौ अनिता माळगे इतर मान्यवर.