Home Breaking News मौजे वडगाव येथे होममिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न

मौजे वडगाव येथे होममिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements

मौजे वडगाव येथे होममिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम संपन्न

 

हेरले / (प्रतिनिधी):- मौजे वडगाव (ता . हातकणंगले) येथील स्वयंभू कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळ प्रणित आर्यन्स ग्रुप यांच्या वतीने गणेश चतुर्थी निमित्य खास महिलांसाठी आयोजित करण्यात आलेला के . के. भाऊजी यांचा खेळ पैठणीचा कार्यक्रम प्रचंड उत्साहात संपन्न झाला .

Advertisements

होममिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे निवेदन के. के . भाऊजी यांनी केले. या कार्यक्रमामध्ये बहुसंख्य भगिनींनी सहभाग घेतला . महिलांसाठी करमणूक व मनोरंजनात्मक विविध खेळ घेण्यात आले . महिलांना घरगुती कामातून विरंगुळा मिळावा आणि एकदिवस मनोरंजन व्हावे यासाठी होममिनिस्टर स्पर्धा घेण्यात आली . या स्पर्धेत महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या

या कार्यक्रमातील प्रथम क्र . व पैठणीच्या मानकरी सौ.मंजूळा चौगुले यांनी बहुमान पटकाविला द्वितीय क्र . अमृता सावंत तर तृतीय क्र . शैलजा तराळ यांनी पटकाविला तसेच उत्तेजनार्थ म्हणून सविता सावंत यांना देण्यात आले . या कार्यक्रमामध्ये महिलांचा उत्साह प्रचंड विलोभनीय होता .

Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements