खोची येथील तालीम संघ गजानन मंडळाच्या श्रींची पो.नि.विलास भोसले यांच्या हस्ते आरती

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    खोची येथील तालीम संघ गजानन मंडळाच्या श्रींची पो.नि.विलास भोसले यांच्या हस्ते आरती

     

     

    खोची,(भक्ती गायकवाड):- खोची ता.हातकणंगले येथील श्री.तालीम संघ गजानन मंडळाच्या वतीने सलग ६८ व्या वर्षी गणेशोत्सव निमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रींची आरती व महाप्रसादाचे वाटप पेठ वडगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.

    Advertisements

    यावेळी पत्रकार विवेक दिंडे,आयुब मुल्ला,पोलीस पाटील मनोज सपकाळ,भाविक जोशी,ज्ञानदेव जाधव प्रमुख उपस्थित होते.यावेळी पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमाची प्रशंसा केली.यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी आयोजित सत्यनारायण महापूजेचा मान सौ. व श्री.गणपती सपकाळ यांना मिळाला.यावेळी विलास जाखले,राजकुमार गुरव,संभाजी जाधव,गणपती जाखले,शामराव जाखले,कुमार जाधव,शिवराम जाखले,पोपट घोडके,रामचंद्र जाधव,भगवान साजणे,बाळासो जाखले,रामचंद्र घोडके,बाबूराव मगदूम,बाबासो पुनाळे,मारुती खांडेकर,सुनील शिंगे,भानुदास गायकवाड,उत्तम जाधव,सोनाजी जाधव,सर्जेराव कागवाडे,भैरवनाथ उपाध्ये आदिसह मंडळाचे सदस्य,कार्येकर्ते उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक नंदकुमार जाखले यांनी केले.

     

    —⬛—

    मंडळाच्या वतीने मंगळवार दि. १० सप्टेंबर पासून ऐतिहासिक देखावा पावनखिंड सादर करण्यात येणार आहे.तरी त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

     

     

    फोटो-खोची येथील श्री तालीम संघ गजानन मंडळाच्या गणेशाची आरती करताना पोलीस निरीक्षक विलास भोसले

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements