टोप येथील भगतसिंग ग्रुपच्या बाल वारकरी दिंडीने सर्वांचे लक्ष वेधले

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    टोप येथील भगतसिंग ग्रुपच्या बाल वारकरी दिंडीने सर्वांचे लक्ष वेधले

     

     

    टोप / (वार्ताहर):- विधायकतेला नेहमीच प्राधान्य देणाऱ्या टोप येथील शहीद भगतसिंग तरुण मंडळाने दगडूशेठ गणेश मूर्तीचे आगमन टाळ मृदुंगाच्या साथीने हरिनामाचा गजर करत बाल वारकऱ्याच्या साथीने दिंडी सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

    Advertisements

    मंडळाने डॉल्बी ला फाटा देत वाकरे ता. करवीर येथील ह भ प तुकाराम पवार महाराज धारवाडकर गुरुजी यांच्या ‘वारकरी विद्यापीठातील’ शिक्षण घेणारे सुमारे शंभर बाल वारकरी यांनी माऊली माऊली,ज्ञानोबा तुकाराम व टाळा चा गजर आणि त्यातून निर्माण होणारा माऊलींचा नादब्रह्म सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.माऊली च्या रथाच्या सादरीकरनाने पालखी सोहळा अवतरला होता. मंडळाच्या परी तिबिले व माही नाईक या दोन लहान मुलींनी समाज प्रबोधनात्मक फलकांनी वाहवा मिळविली.

    मंडळ हे डॉल्बी विरहित, पर्यावरण पूरक, गणेश उत्सव सकल्पना तसेच अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवित असून अनेक वर्षापासून समाज प्रबोधनात्मक देखावा सादरीकरणात अग्रभागी असते. या मिरवणुकीत मंडळातील सर्व कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.

     

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements