मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांना पितृशोक

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

     

    मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांना पितृशोक

     

     

    रत्नागिरी,(प्रतिनिधी):- मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांचे वडील निवृत्त पोलीस अधिकारी नारायणराव आबाजीराव भोसले यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व विवाहित दोन मुलगे एक मुलगी, नातवंडे, पत्वनडे असा मोठा परिवार आहे.

    Advertisements

    नारायणराव भोसले गुजरात पोलीस खात्यात नोकरी करून सेवा निवृत झाले होते. निवृत्ती नंतरचे आयुष्य त्यांनी आपल्या जन्मगावी सुखा समाधानाचे घालवले. त्यांच्या आपल्याश्या करण्याच्या वृत्तीने अनेक सामाजिक क्षेत्रातील मान्यवर जोडले होते. आज त्यांच्या अंत्ययात्रेला शेकडो समाज बांधव विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने जनसागर लोटला होता.बिजघर येथील डूबी नदीच्या तीरावर मराठा क्रांती स्वराज्य संघटना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी भडाग्नी दिला तेंव्हा अनेकांचे डोळे भरून आले. त्यांचे दसपिंड विधि सोमवार दि.१६ रोजी तर उत्तर कार्य बुधवार दिनांक १८ सप्टेंबर २०२४ रोजी साईधाम बिजघर तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात येणार आहे .

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements