ज्युनिअर इंटर झोन अजिंक्यपद स्पर्धेत पश्चिम विभागास कास्यपदक ,संघामध्ये बी.वाय.कॉलेजची खेळाडू वैष्णवी खंदारे हिचा सहभाग

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    ज्युनिअर इंटर झोन अजिंक्यपद स्पर्धेत पश्चिम विभागास कास्यपदक ,संघामध्ये बी.वाय.कॉलेजची खेळाडू वैष्णवी खंदारे हिचा सहभाग

     

     

    कोल्हापूर :- रांची झारखंड येथे पार पडलेल्या पहिल्या ज्युनिअर इंटर झोन अजिंक्यपद स्पर्धेत पश्चिम विभागाने कास्यपदक पटकावले.

    Advertisements

    पश्चिम विभागीय संघामध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, गोवा, दिव दमन या राज्यातील खेळाडूंचा सहभाग होता.

    पेठवडगाव येथील श्री बळवंतराव यादव हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजची खेळाडू कु. वैष्णवी खंदारे सहभागी होती.

    या स्पर्धेमध्ये मिळालेल्या संधीचे तिने अतिशय चांगल्या खेळाचे प्रदर्शन करून यश मिळवले. तिच्या या यशामध्ये क्रीडा मार्गदर्शक संताजी भोसले व हॉकी प्रशिक्षक राहुल गावडे, हॉकी महाराष्ट्र उपाध्यक्ष मनोज भोरे,हॉकी कोल्हापूर अध्यक्षा सौ.सुरेखा पाटील, सचिव मोहन भांडवले यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ साहेब, माजी नगराध्यक्ष श्रीमती विजयदेवी यादव, माजी नगराध्यक्ष सौ‌.विद्या पोळ ताईसाहेब, कार्यवाह अभिजीत गायकवाड (दादा ) मुख्याध्यापक अविनाश पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.

    कु.वैष्णवी खंदारे हिचे विविध स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements