विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तातडीने द्या – सौरभ शेट्टी

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements

    विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती तातडीने द्या – सौरभ शेट्टी

     

     

    कुंभोज,प्रतिनिधी- (विनोद शिंगे):-राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व घटकांची मर्जी राखण्याकडे लक्ष देण्याचे काम चालू आहे, पण राज्य व देशाचे भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. विद्यार्थ्यांची ३२८० कोटीहून अधिक शिष्यवृत्ती सरकारकडे थकीत असून सदर शिष्यवृत्ती तातडीने देण्यात यावे, अशी मागणी सौरभ शेट्टी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राव्दारे मागणी केली आहे.

    Advertisements

    याबाबत देण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे की,
    लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आई-बहिणीला न्याय द्यायचे काम राज्य सरकारने केले आहे. पण शिकत असलेल्या विद्यार्थ्याला आपले सरकार मदत करण्याच्या भूमिकेत नाही, आज आपल्या राज्यामध्ये 3280 कोटीपेक्षा जास्त शिष्यवृत्ती थकीत आहे. जर ही शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना लवकर नाही मिळाली तर विद्यार्थ्यांनी शिक्षण कसे घ्यायचे? जागरूक सरकार म्हणून आम्ही आपल्याकडे खूप आशेने बघत आहोत, पण १८ वर्ष पूर्ण नसल्याने विद्यार्थी मित्रांना मतदानाचा हक्क बजावता येत नाही म्हणून कदाचित त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे का ? अशी शंकेची पाल मनात चुकचुकत आहे. सरकारला खरोखर आपल्या देशाला जर महासत्ता बनवायचा असेल तर देशाचा कणा मजबूत करणे गरजेचे आहे आणि तो कणा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये सुधारणा आणि शैक्षणिक क्रांतीच्या माध्यमातून येईल आणि यासाठी विद्यार्थ्यांची थकीत शिष्यवृत्ती लवकरात लवकर जमा करावी. बहुतांश विद्यार्थी अल्पभूधारक शेतकऱ्यांची मुले आहेत, गोरगरीब कष्ट करणाऱ्यांची मुले आहेत, शिष्यवृत्ती न आल्यामुळे या विद्यार्थ्यांना कर्ज काढून पैसे भरावे लागतात . हे करावेच लागणार आहे, कारण शिष्यवृत्तीचे पैसे जर आले नाहीत तर शिक्षण सम्राट गोरगरीब मुलांना वर्गात बसू देत नाहीत.

    लाडक्या बहिणीच्या मुलांचा सुद्धा विचार सरकार म्हणून करावा आणि लवकरात लवकर या लाखो विद्यार्थ्यांची थकीत असलेली रक्कम 3280 कोटी मिळावी
    अन्यथा या विद्यार्थ्यांना हातात पेनाच्या ऐवजी पुन्हा दगड घेऊन आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागेल असा इशारा विद्यार्थी परिषदेच्या सौरभ शेट्टी यांनी दिला आहे.

    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements
    Advertisements