पत्रकार संतोष सणगर यांनी सलग नवव्या वर्षी केली मुस्लीम बांधवांच्या हस्ते गणेश प्रतिष्ठापना

     

     

    पत्रकार संतोष सणगर यांनी सलग नवव्या वर्षी केली मुस्लीम बांधवांच्या हस्ते गणेश प्रतिष्ठापना

     

     

     

    पेठ वडगाव,(प्रतिनिधी):-  पेठ वडगाव व परिसरात घरगुती व सार्वजनिक गणेश प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात करण्यात आली. तरुण मंडळे व नागरिकांत उत्साहाचे वातावरण होते.

    पेठ वडगाव येथील पत्रकार संतोष सणगर यांनी आपल्या घरी मुस्लीम बांधवांच्या हस्ते गणेश मूर्ती प्रतिष्ठापणा करून हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश दिला.

    शहरात उत्साही वातारणात गणरायाचे आगमन झाले. दिवस प्रामुख्याने पारंपारिक वाद्ये व गणेश गीते, गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात गणरायाचे आगमन झाले. वडगाव शहरात शंभरावर गणेश मंडळांनी वाद्य मिरवणुकांनी गणेश प्रतिस्थापना केली. वडगाव पोलिसांच्या वतीने नगरपालिका चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकासह वडगाव परिसरातील वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. गणेश मंडळांचे गणेश मूर्ती नेण्यासाठी पेठ वडगाव, वाठार येथे गर्दी होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सकाळपासूनच नियोजन लावल्याने विना अडथळा मिरवणुका व गणेश आगमन उत्साहात झाले.

     

    पेठ वडगाव येथे पत्रकार संतोष सणगर यांनी मुस्लीम बांधवांच्या हस्ते आपल्या घरी सलग नवव्या वर्षी गणेश प्रतिष्ठापना करून हिंदू मुस्लीम ऐक्याचा संदेश दिला. ही गणेश प्रतिष्ठापणा ऑल इंडिया मुस्लीम ओबीसी ऑर्गनायझेशन हातकणंगले तालुका उपाध्यक्ष

     

    आदिलशहा फकीर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष फिरोज बागवान, युवक कॉंग्रेसचे तालुका उपाध्यक्ष सुरज जमादार, पोलीस मित्र सिराज मुल्लाणी, रियाज शेख, नाझीम मुल्ला यांच्या हस्ते करण्यात आली.

     

    यावेळी पत्रकार संतोष सणगर, उत्कर्ष सणगर समाजाचे अध्यक्ष बजरंग सणगर, आनंदराव सणगर, दिनेश सणगर, राकेश लोळगे, सतेज मानकर, आरव’ मानकर, उदय मगदूम, विकासराव कांबळे, पोलीस कर्मचारी रवी गायकवाड, महेश गायकवाड, संभाजी जाधव, सतिश माळवदे, रसिका माळवदे, शिवराज कुंभार, ऋषिकेश सणगर, सदाशिव दाभाडे, मालन सणगर, सारीका सणगर, स्वाती सणगर, समृद्धी सणगर, संकेत सणगर, स्वरा सणगर यांचेसह मुस्लीम बांधव उपस्थित होते.

    वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव व परिसरातील गावामध्ये चोख पोलीस बंदोबस्त ठेवून नियोजनबद्ध कामगिरी केली. गणेशाच्या आगमनाने वडगाव परिसरात भक्तिमय वातावरण झाले आहे.