वीरधवल सेवा सोसायटी चेअरमन पदी बाहुबली पाटील, व्हा.चेअरमन पदी सरस्वती कुंडले बिनविरोध निवड
कुंभोज, प्रतिनिधी (विनोद शिंगे ):-हिंगणगाव गावचे जीवनदायी ठरलेल्या वीरधवल सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी माजी राज्यमंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर गटाचे खंदे समर्थक व शरद सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी बाहुबली छबुराव पाटील यांची तर व्हाईस चेअरमन पदी सरस्वती भोपाल कुंडले यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवडीच्या निवडणूक अधिकारी म्हणून हातकणंगले निबंध कार्यालयातील प्रमुख कदम साहेब हे होते. यावेळी स्वाभिमानी आघाडीचे प्रमुख माजी सरपंच संजय देसाई यांच्या हस्ते नूतन चेअरमन व्हाईस चेअरमन यांचा सत्कार करण्यात आला. त्याच पद्धतीने. तसेच हिंगणगाव सहकारी नागरी पाणीपुरवठा संस्थेच्या चेअरमन पदी दिलीप कोळी यांची निवड झाल्याबद्दल व व्हाईस चेअरमन पदी अनंतकुमार देसाई यांची निवड झाल्याबद्दल स्वाभिमानी आघाडी यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना स्वाभिमानी आघाघीचे प्रमुख संजय देसाई म्हणाले की वीरधवल सेवा सोसायटीच्या माध्यमातून हिंगणगाव येथील सर्वसामान्य शेतकऱ्याचा सर्वांगीण विकास साधण्याचे काम सतत केले जात आहे परिणामी हिंगणगाव येथील सभासदांनी केलेल्या सहकार्यामुळे आजपर्यंत वीरधवल सेवा सोसायटी आपल्या कार्यात उल्लेखनीय ठरली आहे. पूरग्रस्त परिस्थिती शेतकऱ्याची कर्जमाफी व शेतकऱ्यांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी वीरधवल सेवा सोसायटीच्या माध्यमातून स्वाभिमानी आघाडी सतत प्रयत्नशील आहे व इथून पुढेही राहणार आहे. हिंगणगावच्या सेवा सोसायटीच्या इतिहासात पहिल्याच वेळी महिला व्हाईस चेअरमन होण्याचा मान सरस्वती कुंडले यांना मिळाला आहे.
यावेळी लोकनियुक्त सरपंच दीपक पाटील ,माजी सरपंच विलास कांबळे संभाजी पाटील बबन पाटील विश्वास कोळी दादासो मानगावे, प्रकाश तेरदाळे, तसेच संस्थेचे संचालक सभासद व स्वाभिमानी आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रतिनिधी विनोद शिंगे कुंभोज