बळवंतराव यादव विद्यालयात इको फ्रेंडली गणेशमूर्ती कार्यशाळा उत्साहात
पेठवडगाव,(प्रतिनिधी):- येथील श्री बळवंतराव यादव विद्यालयात पर्यावरण पूरक (इको फ्रेंडली) गणेशमूर्ती बनवणे कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
विद्यार्थ्यांच्या अंगी पर्यावरणाच्या दृष्टीने जनजागृती व्हावी आणि पर्यावरणाचे महत्त्व समजावे म्हणून विद्यालयातील कला विभागाने (इको फ्रेंडली ) पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत दोनशेहून अधिक विद्यार्थी- विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला व आकर्षक गणपती मूर्ती बनवण्याचा आनंद घेतला.
या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य अविनाश पाटील यांच्या हस्ते तसेच उपमुख्याध्यापिका सौ. मनिषा पोळ यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी पर्यवेक्षक मनोज शिंगे, पी. बी. पाटील, कला विभागप्रमुख डी. एल. कराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होते. विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कलाशिक्षक संतोष कांबळे यांनी केले.
200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पक दृष्टीने अत्यंत सुंदर अशा गणेशाच्या मूर्ती साकारल्या. यावेळी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, अध्यापक, अध्यापिका आणि पालक यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या मूर्तींचे कौतुक केले.
विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी या कलाकृतींचे प्रदर्शन स्थळी भेट देऊन पर्यावरण पूरक कलाकृतींचा रसास्वाद घेतला.
या उपक्रमासाठी कलाध्यापक संघाचे विभागीय अध्यक्ष धनाजी कराडे, कलाशिक्षक संदीप बावचकर, संतोष कांबळे, एकनाथ कुऱ्हाडे यांच्या नेटक्या नियोजनातून हा उपक्रम घेण्यात आला. तसेच संस्थाध्यक्ष व माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, सचिव सौ. विद्याताई पोळ, कार्यवाह अभिजीत गायकवाड यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम घेण्यात आला.