बाबू जमाल पहाडी दर्ग्याचा उद्या श्रावण महिन्यातील शेवटचा उरूस

    बाबू जमाल पहाडी दर्ग्याचा उद्या श्रावण महिन्यातील शेवटचा उरूस

     

     

    कुंभोज प्रतिनिधी (विनोद शिंगे):-कुंभोज, येथील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले हजरत बाबुजमालसाहेब कलंदर पहाडी शरीफ दर्ग्याचा ऊरूस गुरुवारी दिनांक 29, रोजी आहे दरवर्षी श्रावणातील चौथा गुरुवारी हा ऊरसाचा मुख्य दिवस असतो.

     

    या निमित्त दिवसभर विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत सकाळी बाबांच्या समाधीवर गलेफ अर्पण करण्यात येईल, यानंतर कुरआन पठन, सलाम पठन व फातेहा पठण होईल दुपारी समा,ए ,महफिल व बुरुजाचा कार्यक्रम होईल अशी माहिती दर्गा ट्रस्टचे अध्यक्ष शौकत मुजावर यांनी दिली.