वडगावात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तिन हजार रूपये अनेक बहिणीच्या खात्यात जमा
पेठ वडगाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3000 हजार रूपये हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव व परिसरातील गावात आज 16 ऑगस्ट रोजी अनेक बहिणींच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. ओढज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत 13 ऑगस्ट रोजी सागर पार्कवर झालेल्या महिलांच्या मेळाव्यात रक्षाबंधनाची ओवाळणी लवकरच मिळेल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
राखी पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर अनेक बहिणीच्या खात्यात दि.16 रोजी तीन हजार रुपये जमा झाले आहेत. उर्वरित बहिणीच्या खात्यात राखी पौर्णिमेची अगोदर तिन हजार रुपये जमा होणार आहेत. राखी पौर्णिमेच्या दोन दिवस अगोदर पैसे जमा झाल्यामुळे वडगाव व परिसरातील अनेक बहिणी आनंद व्यक्त करत आहेत.